Skip to main content

Posts

Showing posts from June, 2015
सुख कसे फिरे माझ्या इंद्रियांच्या भोवती अनावर इंद्रिये ती आज मला भोवती काल मला फसवून विषयसुख घेतले जिंकल्याचे भासवून आज मला हरवले इंद्रियांच्या तृप्तीमागे वखवखली वासना शांत शांत होई जेव्हा उरतो हा देह ना संतुष्ट अग्नी व्हावा म्हणून तेल ओतले आज रिते पातेले अघटीत पातले
कुंडलीवरती कुंडली मारून त्याच्या बसला शनी मुहूर्त पाहुनी काम करे तो सदा टीकेचा धनी उंबरठे झिजवून ज्योतिषांचे कंबरडे मोडीत गेले हर एक ते पैशासाठी संकट सांगून गेले अशी संकटे त्याच्यावरती उदंड झाली फार पिडीत होती ग्रहनक्षत्रे आता पिडती वार नादी लागती कुडमुड्यांच्या हातात नाही बळ संकटापुढे ठो पळती पळपळ काढिती पळ खोलावरती परावलंबी श्वास कोंडूनी मेला इच्छेनुसार चितेवरतीही मुहूर्त पाहून पेटवला 
आठवण तुझी सूर अनाहत होणे लय ही सोडून ताल भरकटत जाणे आठवण तुझी सोनसळा तारांगणे टिपूर ओतले त्यात पुनव चांदणे आठवण तुझी सरी  मधाच्या मधाळ वेडी धुंद रात्र तिला सुगंधी पाल्हाळ उबदार तुझी काया दुधापरीस दुधाळ त्यात अखंड बुडाले माझे मन हे ओढाळ तुझ्या केसांत केवडा आणि गाली ग जास्वंद ओठी गुलाबाची कळी करी फुलताना धुंद मी सडा प्राजक्ताचा तू धरणीचे अंग कमलांगे सुखावला भ्रमर प्राशुनी मकरंद माझे सुख तुझ्या सुखी सांग कसे मी पाहतो तुला सुखी पाहताना सुख माझे मी मानतो मार्ग तुझ्या सुखाचाही मला सुखाचा भासतो म्हणूनिया त्याच्यावर मी आनंदी चालतो 
का धुंद बागडसी धोका नसल्या हरिणी वाजे शिकाऱ्याची बीन नको येऊ जा दुरुनी हे प्रेम नाही सखे तुझ्या अस्तित्वाची बोली बाण येऊन करील तुझ्या देहाची खांडोळी सावध हो मृगराणी नको लुब्ध होऊ अशी झडकरी वनाप्रती धाव घे तू जीवानिशी प्रेम बीनीच्या सुरात छळ बाणाच्या टोकात प्रेमभंगाची वेदना खोल घुसेल उरात गेली भुलूनिया वेडी सोसाटत आला बाण तिने हसत ठेवले प्रेमासाठी मोल प्राण
प्रेमाचा  वेडा मी  तुझ्या पहा असा झालो दरबारही सोडूनी तो तुझ्या कोठीवरी आलो परी तुझे प्रेम निर्धन भिकाऱ्यावरी हीच सल नांदते रात्रंदिन मम उरी कनक घेई कनकांगिनी घेई रौप्य रूपमती मनस्विनी माणके तू हिरे घेई सौख्य रती धनराशी मजकडे निर्धनात काय सुख त्याच्यावर प्रेम करुनी मिटेल का तुझी भूक झाकीन ही भूमी तुझ्या पावलास पावली अदा कर अदा आता  जी भिकाऱ्यास दावली
मावळला सूर्य कधी मला बाई ना कळले काजव्यांच्या प्रकाशात होते मी गुरफटले बाहेर मी पाहिले गे कोशातून यामिनी कमलपर्ण मिटत होते भ्रमराला मोहुनी कुट्ट-मिट्ट अंध:कार पांघरून सावली सूर्य कुठे दिसेचिना वेळ माझी ठेपली  फुकासाठी जीव गेला अशी माझी धारणा पावलास कवडसा उजाळले ध्येय ना 
मी कधी पूर्ण नव्हतो नव्हतो कधी उणाही घे तुझ्यासाठी देतो माझा मीपणाही वाटते सुख घ्यावे काट्यातले तुलाही या धुंद सागराला हा रंग घे निळाही हा मोगरा माळला केसांत मी तुझिया जो अर्पिला मानसी होता मी देवराया विश्वासली मजवरी तू मन प्राण जीव भावे तुज सांग कसा देऊ जे दिले देवरावे जगी प्रीतीवस्तू कृष्ण त्यालाच तू भजावे तू सुटावे तयासंगे अन मला सोडवावे
जर झाली बंद दारे अथांग सागराची मिलनास त्या नदीने सांगा कुठे फिरावे जेव्हा असे पहारा प्रत्येक अश्रूवरती मग प्रियकरासाठी सांगा कसे झुरावे जर चंद्रमा बुडाला अवचित चांदण्यांत मग चकोरतलगांना मी कसे शांतवावे
हळुवार वेध घ्यावा  अन रात्र गोड प्यावी मंजुळ अंजुळीने चर्या तुझी धरावी केसांत सारीता हात मुखचंद्रमा दिसावा हास्यज्योतीसमयी पेट काळजाने घ्यावा मदमस्त केसांतुनी त्या लटीकेची बट ढळावी तीस सावरू कसा मी हृदयात विरघळावी जरी नभीची चांदणी तू ऐस कोंदणात मी सखा जन्मोजन्मी स्थिर तुझ्या गोंदणात
तुझा शब्द गं गुंजन नादी अमीट तुझ्या त्या आठवणी तुझे रूप गं नित्य नवे अन नित्य नव्या स्मृतीसाठवणी तुझा स्पर्श ग नित्य स्पर्शितो कल्पनेतुनी माझ्या मना मग मग आठवण विरहाची ते अश्रू येती का सांग पुन्हा सफल होईल ना ग कहाणी तुझिया माझ्या प्रेमाची संकटांना तडीपार करूया देऊ परीक्षा धैर्याची     कधीतरी येईल वेळ ती वादही होतील घरांमध्ये आणिक ना काहीच अपेक्षा हात असुदे हातामध्ये