Skip to main content
प्रेमाचा  वेडा मी 
तुझ्या पहा असा झालो
दरबारही सोडूनी तो
तुझ्या कोठीवरी आलो

परी तुझे प्रेम
निर्धन भिकाऱ्यावरी
हीच सल नांदते
रात्रंदिन मम उरी

कनक घेई कनकांगिनी
घेई रौप्य रूपमती
मनस्विनी माणके तू
हिरे घेई सौख्य रती

धनराशी मजकडे
निर्धनात काय सुख
त्याच्यावर प्रेम करुनी
मिटेल का तुझी भूक

झाकीन ही भूमी
तुझ्या पावलास पावली
अदा कर अदा आता 

जी भिकाऱ्यास दावली

Comments