मृदुंग वाजे धानधानधा सृष्टी थिरकत तातातीरीकीट किनकिन तीनतीन भावसमाधी श्वास वाहतो तीटधीटधीटधीट उचंबळे धाधेतत्ता हृदय कीटतकतिरकीट अंग शहारे दींदींदींदीं खळखळ पाणी गीगीतीटगीगीता वाहती वारे भजन टिपेला धिंनधिंधिंना हृदय स्पंदने धेतधेतधेतधा झिंगून मस्तक तींनानाना ना नाकत्ततीरीकीटतकताकेतीरीकीट धाधाधाधा दींदींतीरीकीटतकताकेतीरीकीट धाकिन धाकिन नाद गुंजतो वनावनातून तालदेवता प्रसन्न होई धातीट धीटधीट धाधातुं धाधिंधिंधा धाधिंधिंधा नादसुधा तीट कानोकानी नदीतट धीटधीट कंपन पावे तटस्थ धाधा तटिनी