Skip to main content
तुझा शब्द गं गुंजन नादी
अमीट तुझ्या त्या आठवणी
तुझे रूप गं नित्य नवे अन
नित्य नव्या स्मृतीसाठवणी

तुझा स्पर्श ग नित्य स्पर्शितो
कल्पनेतुनी माझ्या मना
मग मग आठवण विरहाची
ते अश्रू येती का सांग पुन्हा

सफल होईल ना ग कहाणी
तुझिया माझ्या प्रेमाची
संकटांना तडीपार करूया
देऊ परीक्षा धैर्याची  


 कधीतरी येईल वेळ ती
वादही होतील घरांमध्ये
आणिक ना काहीच अपेक्षा

हात असुदे हातामध्ये

Comments