स्वप्न मारले नभास भिडते प्रचलित या काळोखासाठी गुलाम माझा स्व चालला गहाण अवसानाच्या पाठी ओठी येईना शब्द बिचारा मन गोठवणाऱ्या या वाटा कवितेचा मी गळा कापला नाही जाहला कुणास तोटा स्फुरण पोळून टाका माझे पोटासाठी घास हवे फुल तोडले तरी दु:ख ना देठ जगाया मूळ हवे धूसर मायेचा उबारा अश्रूयुगे मजला भुलविती भरले पात्र लाथाडूनिया घासासाठी ओढीत नेती लुबाडले जे जे मिळाले कोण झोंबतो बधीर मनाला सौंदर्याची तमा न उरली देह भोगतो काळोखाला