Skip to main content

मृदुंग वाजे धानधानधा
सृष्टी थिरकत तातातीरीकीट
किनकिन तीनतीन भावसमाधी
श्वास वाहतो तीटधीटधीटधीट

उचंबळे धाधेतत्ता हृदय
कीटतकतिरकीट अंग शहारे
दींदींदींदीं खळखळ पाणी  
गीगीतीटगीगीता वाहती वारे

भजन टिपेला धिंनधिंधिंना
हृदय स्पंदने धेतधेतधेतधा
झिंगून मस्तक तींनानाना ना
नाकत्ततीरीकीटतकताकेतीरीकीट धाधाधाधा

दींदींतीरीकीटतकताकेतीरीकीट धाकिन धाकिन
नाद गुंजतो वनावनातून
तालदेवता प्रसन्न होई
धातीट धीटधीट धाधातुं

धाधिंधिंधा धाधिंधिंधा
नादसुधा तीट कानोकानी
नदीतट धीटधीट कंपन पावे

तटस्थ धाधा तटिनी

Comments