देवा जळो ही वासना |
दुराविते जी चरणा ||१||
राखावे जी पायापाशी |
जेथे पावेन विश्रांती ||२||
देवा करा माझी कीव |
भ्याला पापाला हा जीव ||३||
परिसावे जी माझे बळ |
पावी चौऱ्यांशी कोल्हाळ ||४||
तुम्ही धरावे जी हाता |
कृपा करुनी अनंता ||५||
मणी बहु अपराधी |
सांभाळावे कृपानिधी ||६||
Comments
Post a Comment