अर्पण केले ज्यांनी
सुखाला
स्वातंत्र्याच्या
वेदीवरती
प्राण ठेविले ज्यांनी
त्यांची जाण चला ठेऊ
रक्षण करण्या
मातृभूमीचे
झिजली ज्यांची काया
तारुण्य उधळले
ज्यांनी
त्यांचे भान चला ठेऊ
स्वातंत्र्याचा तरुवर
ज्यांनी
रक्तसिंचने जपला
आयुष्य वेचिले
ज्यांनी
त्यांचे गुण चला गाऊ
लौकिक राखण्या देशाचा
लौकिक आपला सांडला
देह समर्पिला ज्यांनी
त्यांचा मान चला ठेऊ
स्वातंत्र्याचा विचार
आणि
विचाराच्या
स्वातंत्र्याची
बीजे पेरली ज्यांनी
त्यांचे वाण हाती घेऊ
Comments
Post a Comment