Skip to main content
मज जाणवावे जे असे
ते जाणिवेपल्याडले
जेथ शब्दा नाद स्पर्श
श्वास अन गंधाळले

मज नेणिवेचा विसर नको
अन जाणिवेची जाण हवी
ऐहीकाची शाश्वताला
जोडणारी नाळ हवी

चिदाकारले चित्त हवे मज
गलबलणारे मनही हवे
विशुद्ध चैतन्याच्या बागा
अवनीवरती मनू नवे

सोंगाडी मी होऊ कसा
अन मुखवट्यात मी राहू कसा
सोंगाची मज सवय नको रे
ओळख मजला मीच असा

उरात कोरड नको उमाळे
हृदयाहृदयी बंध हवे
प्रेम विशुद्ध, नको आसक्ती
आनंदाचे मार्ग नवे

  

Comments

Popular posts from this blog

पडू दे भुरळ मनाला मोहू दे क्षणाक्षणाला.. तुझे मीपण अन माझे नाही आणि कुणाला सख्या रे बावरलेल्या रंग दे या मनाला .. साजणा स्पर्शून जा रे राजसा कणाकणाला सडा हा नक्षत्रांचा लागले मी पणाला .. मला पाकळ्यांत घे ना दूर सारुनी उन्हाला साजणा लिंपून जा रे आतुरल्या या तनाला
अर्पण केले ज्यांनी सुखाला स्वातंत्र्याच्या वेदीवरती प्राण ठेविले ज्यांनी त्यांची जाण चला ठेऊ रक्षण करण्या मातृभूमीचे झिजली ज्यांची काया तारुण्य उधळले ज्यांनी त्यांचे भान चला ठेऊ स्वातंत्र्याचा तरुवर ज्यांनी रक्तसिंचने जपला आयुष्य वेचिले ज्यांनी त्यांचे गुण चला गाऊ लौकिक राखण्या देशाचा लौकिक आपला सांडला देह समर्पिला ज्यांनी त्यांचा मान चला ठेऊ   स्वातंत्र्याचा विचार आणि विचाराच्या स्वातंत्र्याची बीजे पेरली ज्यांनी त्यांचे वाण हाती घेऊ