Skip to main content
पथिका घेई इथे विश्रांती  ||धृ||

ऐन दुपारी कुणा शोधिशी
गोधने चरती येथे
वनाभिसारी इथेच राघू  
मैना भिरभिर फिरते
तप्ततापल्या तनामनाच्या
मिळेल तुजला शांती

मंदसुगंधी मोहर, फुलला
गुंजारव भ्रमरांचा
कामशरासी अनुकूल वारा
झुळकला वसंताचा  
स्वयंदुती अन प्रेमचंचला
पाणी भरण्या येती 

Comments