Skip to main content
आला सोसाट्याचा वारा
धूळ टेकली अंबरा
झाडं हालली डूलली
नाही पाचोळ्याला थारा ...

थरथर झाली काया
बुंध्यासहित झाडाची
वारा झटून घुसला
पानं झाली पाचोळ्याची ...

अवजडलेली काया
गेली धुळीत माखून
ढग भलं थेंबारलं
आलं नभात दाटून ...

भरकटली पाखरं
वाऱ्यासंगं झोकांडली
जवा चातकाची तान
डोळ्यांतून वोसंडली ...
   
थयथया नाचं मोरं
पीसं वाऱ्यात झोकून
सृष्टी न्हाली कोंभावली
बुंथ लाजंची फेकून...  

Comments