Skip to main content
पसरुनी घोंगडी
वरी बसे कान्हा
तोंडे झाली वेंगडी
काय म्हणे आणा

आणा तुम्ही शिदोरी
माझियासारखी
वेगळाली ज्यांची
ती काल्याला पारखी

पारखी तो कान्हा
एकएकाच्या शिदोऱ्या
उत्तम त्या घेई
सारे वेगळाल्या बऱ्या

बऱ्या बोले कान्हा
तू घेई घेई मजसी
तुझ्यावीण मज न कुणी
शोभे का तुजसी

तुजसी माझी मैत्री गड्या
तुझ्या मोहे मंतरलो
कुठून आणू शिदोरी
मी घरालाही अंतरलो 

Comments

Popular posts from this blog

आला सोसाट्याचा वारा धूळ टेकली अंबरा झाडं हालली डूलली नाही पाचोळ्याला थारा ... थरथर झाली काया बुंध्यासहित झाडाची वारा झटून घुसला पानं झाली पाचोळ्याची ... अवजडलेली काया गेली धुळीत माखून ढग भलं थेंबारलं आलं नभात दाटून ... भरकटली पाखरं वाऱ्यासंगं झोकांडली जवा चातकाची तान डोळ्यांतून वोसंडली ...     थयथया नाचं मोरं पीसं वाऱ्यात झोकून सृष्टी न्हाली कोंभावली बुंथ लाजंची फेकून...  
पडू दे भुरळ मनाला मोहू दे क्षणाक्षणाला.. तुझे मीपण अन माझे नाही आणि कुणाला सख्या रे बावरलेल्या रंग दे या मनाला .. साजणा स्पर्शून जा रे राजसा कणाकणाला सडा हा नक्षत्रांचा लागले मी पणाला .. मला पाकळ्यांत घे ना दूर सारुनी उन्हाला साजणा लिंपून जा रे आतुरल्या या तनाला
पथिका घेई इथे विश्रांती  ||धृ|| ऐन दुपारी कुणा शोधिशी गोधने चरती येथे वनाभिसारी इथेच राघू   मैना भिरभिर फिरते तप्ततापल्या तनामनाच्या मिळेल तुजला शांती मंदसुगंधी मोहर, फुलला गुंजारव भ्रमरांचा कामशरासी अनुकूल वारा झुळकला वसंताचा   स्वयंदुती अन प्रेमचंचला पाणी भरण्या येती