Skip to main content
अजून जरा नात्यांचे
बंध थोडे कसू दे
चित्र स्पष्ट होण्यासाठी
धूळ थोडी बसू दे

तुझे हृदय माझ्यासाठी
अजून थोडे उसू दे
थोडेसुद्धा त्यात अंतर
आता मात्र नसू दे

तुझा खरा भाव
ह्या कवितेत ठसू दे
अजून थोडे तुझ्या घरी
बोलायला बसू दे

एक तुझ्या डोळ्यातला
हातावर आसू दे
दुसरीकडे जरा मला
गालावरचे हासू दे

तोलू दे जरा मला
आसू आणि हासू
एवढं झाल्यावर आपण

कविता लिहायला बसू 

Comments

Popular posts from this blog

आला सोसाट्याचा वारा धूळ टेकली अंबरा झाडं हालली डूलली नाही पाचोळ्याला थारा ... थरथर झाली काया बुंध्यासहित झाडाची वारा झटून घुसला पानं झाली पाचोळ्याची ... अवजडलेली काया गेली धुळीत माखून ढग भलं थेंबारलं आलं नभात दाटून ... भरकटली पाखरं वाऱ्यासंगं झोकांडली जवा चातकाची तान डोळ्यांतून वोसंडली ...     थयथया नाचं मोरं पीसं वाऱ्यात झोकून सृष्टी न्हाली कोंभावली बुंथ लाजंची फेकून...  
पडू दे भुरळ मनाला मोहू दे क्षणाक्षणाला.. तुझे मीपण अन माझे नाही आणि कुणाला सख्या रे बावरलेल्या रंग दे या मनाला .. साजणा स्पर्शून जा रे राजसा कणाकणाला सडा हा नक्षत्रांचा लागले मी पणाला .. मला पाकळ्यांत घे ना दूर सारुनी उन्हाला साजणा लिंपून जा रे आतुरल्या या तनाला
पथिका घेई इथे विश्रांती  ||धृ|| ऐन दुपारी कुणा शोधिशी गोधने चरती येथे वनाभिसारी इथेच राघू   मैना भिरभिर फिरते तप्ततापल्या तनामनाच्या मिळेल तुजला शांती मंदसुगंधी मोहर, फुलला गुंजारव भ्रमरांचा कामशरासी अनुकूल वारा झुळकला वसंताचा   स्वयंदुती अन प्रेमचंचला पाणी भरण्या येती