Skip to main content
सूर्य धगधगे ओकीत अंगार
शांत मी निजलो लावूनिया दार
कर्म पांघरुनी झालो साकार
बा सूर्याशी नाही तक्रार
 
ना मरती ना हरती कशाने
हाकारली मी कितेक स्वप्ने
त्या स्वप्नांतून जागती कवने
माहित नाही त्यांना लवणे

पायथ्याशी मी स्वप्नफुलांच्या
ओतल्या वेदना मनाच्या
निखारल्या मी अपमानांच्या
भोवती राशी फुलतळाच्या

खबदाडांतून उठतील फुटतील
फुले घनांच्या माथी बसतील
उजळे भाग्य जे जे कसतील
दरिद्री होतील जे जे हसतील


स्वप्नफुल आवडेल देवा
श्रीमंत करतील त्याचा हेवा
तयांपासुनी लपवूनी ठेवा

अडले नडले त्यांना दावा

Comments

Popular posts from this blog

पडू दे भुरळ मनाला मोहू दे क्षणाक्षणाला.. तुझे मीपण अन माझे नाही आणि कुणाला सख्या रे बावरलेल्या रंग दे या मनाला .. साजणा स्पर्शून जा रे राजसा कणाकणाला सडा हा नक्षत्रांचा लागले मी पणाला .. मला पाकळ्यांत घे ना दूर सारुनी उन्हाला साजणा लिंपून जा रे आतुरल्या या तनाला
मज जाणवावे जे असे ते जाणिवेपल्याडले जेथ शब्दा नाद स्पर्श श्वास अन गंधाळले मज नेणिवेचा विसर नको अन जाणिवेची जाण हवी ऐहीकाची शाश्वताला जोडणारी नाळ हवी चिदाकारले चित्त हवे मज गलबलणारे मनही हवे विशुद्ध चैतन्याच्या बागा अवनीवरती मनू नवे सोंगाडी मी होऊ कसा अन मुखवट्यात मी राहू कसा सोंगाची मज सवय नको रे ओळख मजला मीच असा उरात कोरड नको उमाळे हृदयाहृदयी बंध हवे प्रेम विशुद्ध, नको आसक्ती आनंदाचे मार्ग नवे   
अर्पण केले ज्यांनी सुखाला स्वातंत्र्याच्या वेदीवरती प्राण ठेविले ज्यांनी त्यांची जाण चला ठेऊ रक्षण करण्या मातृभूमीचे झिजली ज्यांची काया तारुण्य उधळले ज्यांनी त्यांचे भान चला ठेऊ स्वातंत्र्याचा तरुवर ज्यांनी रक्तसिंचने जपला आयुष्य वेचिले ज्यांनी त्यांचे गुण चला गाऊ लौकिक राखण्या देशाचा लौकिक आपला सांडला देह समर्पिला ज्यांनी त्यांचा मान चला ठेऊ   स्वातंत्र्याचा विचार आणि विचाराच्या स्वातंत्र्याची बीजे पेरली ज्यांनी त्यांचे वाण हाती घेऊ