रवी लुप्तला तरी तेज
कसे चमकते
शब्द विरला तरी
मनी अजून दु:ख ते
तेजाला अर्थ नाही
दु:खाला अर्थ नाही
सांजवेळ आली तरी
मना दु:ख कसे नाही
प्रकाश भोगण्याची इच्छा
अजून कशी गेली नाही
मनाला अर्थ नाही
इच्छेला अर्थ नाही
सुख भोगी अंधारी
भोगणाऱ्या दु:ख नाही
जगालाही दु:ख नाही
सुखालाही दु:ख नाही
जगालाही सुख नाही
अखंड स्वार्थ जपणाऱ्या
मानवाला अर्थ नाही
परोपकारी देह व्यर्थ
यासमही स्वार्थ नाही
Comments
Post a Comment