Skip to main content
शिळोप्याच्या गप्पांनी
गजबजली ओसरी
रान फिरून दमलेली
गाय झाली ढोपरी

बैल घाशी गाताडीला
पोळी पुन्हा खाजली
मांडणीला वाजती
भुकेजली ताटली

पोरं जेवू घालताना
माय मनी साठली
पोरं झाली तृप्त
तिची भूक पोटी आटली

किर्र झाली रात
सारी खुशालीत झोपली
गोठ्यातली जनावरं
जागसूद पहुडली

देवा म्होरं शांत दिवा
मंद मंद तेवलेला
घासाच्या काळजीत

बाप फक्त जागलेला 

Comments

Popular posts from this blog

आला सोसाट्याचा वारा धूळ टेकली अंबरा झाडं हालली डूलली नाही पाचोळ्याला थारा ... थरथर झाली काया बुंध्यासहित झाडाची वारा झटून घुसला पानं झाली पाचोळ्याची ... अवजडलेली काया गेली धुळीत माखून ढग भलं थेंबारलं आलं नभात दाटून ... भरकटली पाखरं वाऱ्यासंगं झोकांडली जवा चातकाची तान डोळ्यांतून वोसंडली ...     थयथया नाचं मोरं पीसं वाऱ्यात झोकून सृष्टी न्हाली कोंभावली बुंथ लाजंची फेकून...  
पडू दे भुरळ मनाला मोहू दे क्षणाक्षणाला.. तुझे मीपण अन माझे नाही आणि कुणाला सख्या रे बावरलेल्या रंग दे या मनाला .. साजणा स्पर्शून जा रे राजसा कणाकणाला सडा हा नक्षत्रांचा लागले मी पणाला .. मला पाकळ्यांत घे ना दूर सारुनी उन्हाला साजणा लिंपून जा रे आतुरल्या या तनाला
पथिका घेई इथे विश्रांती  ||धृ|| ऐन दुपारी कुणा शोधिशी गोधने चरती येथे वनाभिसारी इथेच राघू   मैना भिरभिर फिरते तप्ततापल्या तनामनाच्या मिळेल तुजला शांती मंदसुगंधी मोहर, फुलला गुंजारव भ्रमरांचा कामशरासी अनुकूल वारा झुळकला वसंताचा   स्वयंदुती अन प्रेमचंचला पाणी भरण्या येती