Skip to main content
नयनांत लालसर हेवा
ओठात गुलाबी दावे
आज काय म्हणुनी आले
गालांवर रुसवे फुगवे

मी कट्टी-फू तुजसंगे
असे पुन्हा पुन्हा का म्हणसी
निश्चय करिसी अबोलण्याचा
पुन्हा पुन्हा का फिरसी

हीच भावना खरी तरीही
तू का रागे भरसी खोटे
मी हसुनी दावी मग का
पुन्हा दु:ख तुला ते वाटे

विश्वास आहे हे म्हणसी तरीही
युवती मत्सर दाविसी का
विचार तुझा हा सवतीचा मग
मलाच दोषी धरिसी का

हे रागे खोटे भरसी तरीही
हृदयी दु:खी अससी
हे कावे माझे कळून तरीही

वेडे पुन्हा फससी 

Comments

Popular posts from this blog

आला सोसाट्याचा वारा धूळ टेकली अंबरा झाडं हालली डूलली नाही पाचोळ्याला थारा ... थरथर झाली काया बुंध्यासहित झाडाची वारा झटून घुसला पानं झाली पाचोळ्याची ... अवजडलेली काया गेली धुळीत माखून ढग भलं थेंबारलं आलं नभात दाटून ... भरकटली पाखरं वाऱ्यासंगं झोकांडली जवा चातकाची तान डोळ्यांतून वोसंडली ...     थयथया नाचं मोरं पीसं वाऱ्यात झोकून सृष्टी न्हाली कोंभावली बुंथ लाजंची फेकून...  
पडू दे भुरळ मनाला मोहू दे क्षणाक्षणाला.. तुझे मीपण अन माझे नाही आणि कुणाला सख्या रे बावरलेल्या रंग दे या मनाला .. साजणा स्पर्शून जा रे राजसा कणाकणाला सडा हा नक्षत्रांचा लागले मी पणाला .. मला पाकळ्यांत घे ना दूर सारुनी उन्हाला साजणा लिंपून जा रे आतुरल्या या तनाला
पथिका घेई इथे विश्रांती  ||धृ|| ऐन दुपारी कुणा शोधिशी गोधने चरती येथे वनाभिसारी इथेच राघू   मैना भिरभिर फिरते तप्ततापल्या तनामनाच्या मिळेल तुजला शांती मंदसुगंधी मोहर, फुलला गुंजारव भ्रमरांचा कामशरासी अनुकूल वारा झुळकला वसंताचा   स्वयंदुती अन प्रेमचंचला पाणी भरण्या येती