एकदाच एकदाच
वाण असा खास झाला
बहरलेल्या शेताचा
माळरान ओस झाला
एकदाच एकदाच
पाणी फुटे धणीवरी
पातेल्यात ना मावले
उरे दुष्काळ हा उरी
एकदाच एकदाच
घन असा बरसला
माझा मोतियाचा दाणा
त्यात सुकुनिया गेला
मृगजळ मी शिंपले
शुष्क पिकली ढेकळे
आले अमाप ते पिक
नाही ओंजळी मावले
माझी जमीन नापीक
माझे आकाश निर्जल
बुजगावणे ते शेती
उभे आहे रे निश्चल

Comments
Post a Comment