Skip to main content

पर्वताच्या पलीकडे
तो किल्ला कातळ वस्तीत
पाऊल चुकता राजकुमारा
मृत्यू भेटे निश्चित

दैवगती ना चुकली कोणा
शत्रू लोटला महाभयंकर
तुंबळ भिडली शस्त्रे अस्त्रे
त्वरे माजला भयाण संगर

पराक्रमी तो राजा होता
शत्रूंवरती तुटून पडला
झाला किंतु महापराजय
वीरगती तो रणी पावला

या डोळ्यांनी पाहिले मी
कितेक जळते देह
राजवाडा दग्ध उपवने
प्रासाद जळते गेह

भग्न भासतील कितेक वाडे
कितेक कबरी किती सांगाडे
वेशीबाहेर हटकून मिळतील
मरीआईचे भयाण गाडे

गवताचे पाते ना उरले
ना राज्य ना उरला राजा
प्रारंभ शून्यातुनी आता हा

तू कुमार अन मी प्रजा

Comments

Popular posts from this blog

पडू दे भुरळ मनाला मोहू दे क्षणाक्षणाला.. तुझे मीपण अन माझे नाही आणि कुणाला सख्या रे बावरलेल्या रंग दे या मनाला .. साजणा स्पर्शून जा रे राजसा कणाकणाला सडा हा नक्षत्रांचा लागले मी पणाला .. मला पाकळ्यांत घे ना दूर सारुनी उन्हाला साजणा लिंपून जा रे आतुरल्या या तनाला
मज जाणवावे जे असे ते जाणिवेपल्याडले जेथ शब्दा नाद स्पर्श श्वास अन गंधाळले मज नेणिवेचा विसर नको अन जाणिवेची जाण हवी ऐहीकाची शाश्वताला जोडणारी नाळ हवी चिदाकारले चित्त हवे मज गलबलणारे मनही हवे विशुद्ध चैतन्याच्या बागा अवनीवरती मनू नवे सोंगाडी मी होऊ कसा अन मुखवट्यात मी राहू कसा सोंगाची मज सवय नको रे ओळख मजला मीच असा उरात कोरड नको उमाळे हृदयाहृदयी बंध हवे प्रेम विशुद्ध, नको आसक्ती आनंदाचे मार्ग नवे   
अर्पण केले ज्यांनी सुखाला स्वातंत्र्याच्या वेदीवरती प्राण ठेविले ज्यांनी त्यांची जाण चला ठेऊ रक्षण करण्या मातृभूमीचे झिजली ज्यांची काया तारुण्य उधळले ज्यांनी त्यांचे भान चला ठेऊ स्वातंत्र्याचा तरुवर ज्यांनी रक्तसिंचने जपला आयुष्य वेचिले ज्यांनी त्यांचे गुण चला गाऊ लौकिक राखण्या देशाचा लौकिक आपला सांडला देह समर्पिला ज्यांनी त्यांचा मान चला ठेऊ   स्वातंत्र्याचा विचार आणि विचाराच्या स्वातंत्र्याची बीजे पेरली ज्यांनी त्यांचे वाण हाती घेऊ