Skip to main content

कल्पतरू महावृक्ष जरी का
इच्छेवीन ते नच फळती
परी काही वृक्ष भूतळी
अव्यक्त मनही जाणती

मनीचा क्षणी भाव प्रगटता
चिंतामणी तो होतो देता
एक मणी जो वसे भूतळी
इच्छेवीण होतो पुरविता

कर्ण असो वा शिबी राजाही
दानशूर तो असो बळी
मागितल्यावीण कुणी न दिधले
अजूनही या भूमंडळी

तरी तरी या मर्त्य मंडळी
एक आहे पहा नवलाई
मागितल्यावीण सर्वही देते
जग हे म्हणते तिजला आई


मागितल्यावीण जाते पुरवीत
अशी आईची अगाध माया
देव देव तू करीत का रे
तीर्थे फिरसी भ्रमसी वाया







Comments

Popular posts from this blog

पडू दे भुरळ मनाला मोहू दे क्षणाक्षणाला.. तुझे मीपण अन माझे नाही आणि कुणाला सख्या रे बावरलेल्या रंग दे या मनाला .. साजणा स्पर्शून जा रे राजसा कणाकणाला सडा हा नक्षत्रांचा लागले मी पणाला .. मला पाकळ्यांत घे ना दूर सारुनी उन्हाला साजणा लिंपून जा रे आतुरल्या या तनाला
मज जाणवावे जे असे ते जाणिवेपल्याडले जेथ शब्दा नाद स्पर्श श्वास अन गंधाळले मज नेणिवेचा विसर नको अन जाणिवेची जाण हवी ऐहीकाची शाश्वताला जोडणारी नाळ हवी चिदाकारले चित्त हवे मज गलबलणारे मनही हवे विशुद्ध चैतन्याच्या बागा अवनीवरती मनू नवे सोंगाडी मी होऊ कसा अन मुखवट्यात मी राहू कसा सोंगाची मज सवय नको रे ओळख मजला मीच असा उरात कोरड नको उमाळे हृदयाहृदयी बंध हवे प्रेम विशुद्ध, नको आसक्ती आनंदाचे मार्ग नवे   
अर्पण केले ज्यांनी सुखाला स्वातंत्र्याच्या वेदीवरती प्राण ठेविले ज्यांनी त्यांची जाण चला ठेऊ रक्षण करण्या मातृभूमीचे झिजली ज्यांची काया तारुण्य उधळले ज्यांनी त्यांचे भान चला ठेऊ स्वातंत्र्याचा तरुवर ज्यांनी रक्तसिंचने जपला आयुष्य वेचिले ज्यांनी त्यांचे गुण चला गाऊ लौकिक राखण्या देशाचा लौकिक आपला सांडला देह समर्पिला ज्यांनी त्यांचा मान चला ठेऊ   स्वातंत्र्याचा विचार आणि विचाराच्या स्वातंत्र्याची बीजे पेरली ज्यांनी त्यांचे वाण हाती घेऊ