ओठ कालचे शब्द नवे
नयन कालचे भाव नवे
नाते कालचे बंध नवे
हृदय कालचे प्रेम नवे
हात कालचे नव्याचं रेषा
मने कालची नव्याचं आशा
वाट कालची नव्याचं दिशा
शब्द बोलती नव्याचं भाषा
गीत उमटले असे सुरांतून
झंकारले दोन्ही हृदयातून
निज प्रेमाच्या लहरी दाटून
ओळख पटली मग स्पर्शातून
भणाणला मग शांत वारा
छेडू लागला नदी-किनारा
पळू लागला अवखळ तारा
चांदण्यांचा होई पसारा
विरघळले ते भाव करारे
कुशीत घेती धाव आसरे
वाहू लागले मंद वारे
झळाळले तारांगण सारे
.jpg)
Comments
Post a Comment