भाव मनीचा कोवळा हा
कसे घणाचे झेलू घाव
क्रूर देशी दूर आलो
सोडून मागे माझा गाव
हे कधी ना इच्छिले
स्वप्नीही नाही पाहिले
या कुठे रे अनोळख्या
बंदरात तारू लागले
सुटायचे मज येथून निश्चित
अंधकार हा लोटा दूर
प्रकाश झगमगला पाहिजे
जीवनाचा मग पालटे नूर
भीती ग्रासते चहूबाजूंनी
धरणीचाही नाही ठाव
अनोळख्या शहरात एकटा
दूर राहिला माझा गाव
आधार नाही इथे कुणाचा
बाप न मजला उरली माय
कोण सोडवील येथून सांगा
त्याचे जाऊन धरीन पाय
.jpg)
Comments
Post a Comment