Skip to main content

तुझं भरलं कपाळं
माझं वशाड मोकळं
माझं केसं बांधलेलं
तुझं मोकळंढाकळं
 
तुझ्या कानात बोलका
पती देई आणाभाका
माझ्या हातावं उरल्या
काळ्या नियतीच्या रेखा
 
काय हवे नको मनी
सांगशील त्याच्या कानी
मला सोडूनीया गेला
माझ्या कुंकवाचा धनी
 
ज्याने प्रकाश दावला
तोचं सूर्य मावळला
सुखी संसाराचा त्यानं
डाव अर्ध्यावं सोडला
 
 
होती सुखाची जी गाणी
झाली दुःखाची विराणी
प्रतिमा उराव्यात परी
उरू नये आठवणी
 

 

Comments

Popular posts from this blog

आला सोसाट्याचा वारा धूळ टेकली अंबरा झाडं हालली डूलली नाही पाचोळ्याला थारा ... थरथर झाली काया बुंध्यासहित झाडाची वारा झटून घुसला पानं झाली पाचोळ्याची ... अवजडलेली काया गेली धुळीत माखून ढग भलं थेंबारलं आलं नभात दाटून ... भरकटली पाखरं वाऱ्यासंगं झोकांडली जवा चातकाची तान डोळ्यांतून वोसंडली ...     थयथया नाचं मोरं पीसं वाऱ्यात झोकून सृष्टी न्हाली कोंभावली बुंथ लाजंची फेकून...  
पडू दे भुरळ मनाला मोहू दे क्षणाक्षणाला.. तुझे मीपण अन माझे नाही आणि कुणाला सख्या रे बावरलेल्या रंग दे या मनाला .. साजणा स्पर्शून जा रे राजसा कणाकणाला सडा हा नक्षत्रांचा लागले मी पणाला .. मला पाकळ्यांत घे ना दूर सारुनी उन्हाला साजणा लिंपून जा रे आतुरल्या या तनाला
पथिका घेई इथे विश्रांती  ||धृ|| ऐन दुपारी कुणा शोधिशी गोधने चरती येथे वनाभिसारी इथेच राघू   मैना भिरभिर फिरते तप्ततापल्या तनामनाच्या मिळेल तुजला शांती मंदसुगंधी मोहर, फुलला गुंजारव भ्रमरांचा कामशरासी अनुकूल वारा झुळकला वसंताचा   स्वयंदुती अन प्रेमचंचला पाणी भरण्या येती