मना-मनात पेटवा
राष्ट्रहित जाणिवा
जना-जनात सर्वथा
लागुदेच वोणवा
चला उठा लढा विरोधी
शक्ती थांबवा
मंद झाल्या विस्तवा पुन:
पुन: चेतवा ||१||
कोण जो नभी उभा
आमुच्यापरीस तो
त्यास युक्तीने
क्षणार्धात पाठी टाकतो
अतिदूर मंगळी यान
त्वरे धाडीतो
अतिबलाढ्य भारता
जगात प्राप्त वाहवा
मंद झाल्या विस्तवा
पुन: पुन: चेतवा ||२||
घोष बोला गीत गर्जा
द्या आरोळी भारती
नभी भिडे गर्जना
शत्रू भये कांपती
उंचमान कीर्तीचे जगी
नगारे वाजती
बाहू ध्वजदंड ते नभात
उंच-उंचवा
मंद झाल्या विस्तवा
पुन: पुन: चेतवा ||३||
शस्त्रसंधी
उल्लंघितो भ्याड चीन काय तो
आडून लपून पाक तो
शत्रुघात साधितो
युवकांनो युवतींनो
दास तुम्हा प्रार्थितो
प्रखर करा ज्योत अभिमान
जागवा
मंद झाल्या विस्तवा
पुन: पुन: चेतवा ||४||

Comments
Post a Comment