चंद्रावानी रूप तुझ माझ्या उमललं डोळ्यात
चांदण्याचं प्रेम सारं माझ्या उतरलं मनात
ओठांवरी गालावरी हास्य फुलांचं खळखळलं
ते पाहताना हळू हृदय आभाळ गलबललं
उर्मींचा त्या पाउस आला प्रेमसरी कोसळल्या
जमिनीच्या मृद्गंधानं आठवणी उसळल्या
थेंब झेलत अंगावरी मोर नाचेल वनात
भंगलेल प्रेम माझं तुझ्या रुजेल मनात
वेगळालं तुझं-माझं झालं होतं जे वळण
भूमी पाऊसधारागतं पुन्हा येऊ दे जुळून

Comments
Post a Comment