Skip to main content
भावना संपली संपली कविता
ओढून ताणून कित्येक करता
होतील काही सुंदरही पण
कविता नाही ती तत्वता

कविता येते कुठून गड्या
हे कसे सांगू मी बापडा
कधी कधी शब्दाश्रू सुकवते 
कधी पंक्तीचा होतो सडा 

कविता सगळीकडेच आहे
कवितेविण अनु नाही काही
स्फुरते त्याला जो प्रामाणिक
सदासर्वदा तिजसी राही

बोलावत जा येईल रे ती
असुदे हृदय फक्त खुले
पसरव ओंजळ ठेवून विश्वास
मिळतील खचितच छान फुले

Comments