Skip to main content
कुणी का ओढावी
काळी गच्च झापडे
जळी तरंगतेय
शांत कुणाचे बछडे

कुठे ढीग-कचऱ्यात
सडे मानवी भ्रुण
नरकी खपतील पालक ऐसे
लंपट खुनी निर्घृण

कधी उंचावरूनी
फेकिती तान्हा गोळा
तो छिन्नविछिन्न 
देह जसा पाचोळा

कर्तुत्वाने हीन पिता की
चारित्र्यशून्य माता
संवेदनाहीन कशी माणसे
वत्सलभावही कोता

माणसामधील माणूस जेव्हा
अशा प्रकारे लोपे
कशी फिटतील कुणी सांगावे

अशी भयानक पापे 

Comments