Skip to main content
दगड पळवणाऱ्यांची
झाली तुफान गर्दी
तो बुरुज देत होता
आज शेवटची वर्दी

अपेक्षा होती बुरुजाला
सावरणाऱ्या हातांची
कारण तिथे कमी नव्हती
पराक्रमाच्या बातांची

रक्ताचाच करून गिलावा
श्रमले होते कित्येक मावळे
त्या बुरुजाला थडगे ठरवून
लाळ गाळीती कित्येक कावळे

एक एक दगड पळवून तुम्ही
नका ढासळवू आम्हाला
पारतंत्र्यातल्या वेदना
नसती ठावूक तुम्हाला

एक एक करून सारे दगड
पळवून नेती कोडगे
स्मारक तोडून पर्यायाने

बांधती आपले थडगे 

Comments