Skip to main content

साप निघाले साप निघाले
जमीन त्यांनी धोपटली
डोकी गेली फुटून तरीही
बुद्धी नाही वापरली

पर्वताइतकी सुजून झाली
मोठी त्यांची करंगळी
सूज कमी कराया त्यांनी
पूजा व्रते आरंभली

हविभाग तो सेवायाला
जमली हावरट तोंडे
घास उतरवुनी गळी
त्याच्या मानेत बांधले धोंडे

इप्सित साध्य करण्या त्याने
अश्वमेधही केला
झापड गच्च झाली
घोडा उर फुटुनी मेला


काहीतरी द्याच आता
जेव्हा केला चित्कार
डोळे दाबले त्याचे
त्याला झाला साक्षात्कार



Comments