Skip to main content

नको नको असे हाथ
कधी सोडतील साथ
दे रे ऐक्याची भावना
आणि एकोप्याचे गीत

नात्यामधला विश्वास
असा अखंड राहू दे
तिच्या डोही अंतरंगी
मला स्वच्छंद डुबू दे


हृदयामधील भावना
अशी असावी प्रेमाची
हात घे ना हाती मग
नाही पर्वा या जगाची

मी चंद्र तुझा भोळा
तू सखी ग चांदणी
संगतीने स्वप्ने पाहू
करू संसार मांडणी


सखे सावलीत तुझ्या
माझी संपे वणवण
आरस्पानी मन तुझ
माझ्या आयुष्याचं धन

काही नाही आणि इच्छा
तू असता जीवनी
दु:ख काळोख सारून

सुख येईल अंगणी

Comments