मोहे पावा मना विसावा
कान्हा परते घरी ||धृ||
लाल आभाळी कातरवेळी
ऐकू येई धून सावळी
वनावनांतून कर्णफुलांतून
वाजवितो बासरी ||१||
भान हरपले या गोविंदे
वळीतो गोधन नाना छंदे
पाठीवरुनी हात फिरवितो
गाईंच्या मुरारी ||२||
गाईसंगे सैर धावितो
उड्या मारितो खोड्या करितो
भान विसरले गौळ-गौळणी
कौतुक करिती सारी ||३||
पक्षी ते घरट्यात परतती
आतुर गौळणी मनात हसती
दिवे लावूनी निमित्त करुनी
द्वाड पाहती हरी ||४||
लागली चाहूल यशोदा धावे
हरी पाहता हृदय सुखावे
सुंदर बाळा तुझ्यावाचुनी
क्षण न राहवे दुरी ||५||

Comments
Post a Comment