Skip to main content

घर नाना पाटलाचं
माजलेल्या डोंगराला
जिथं झरा उबडला
तिथं आडव्या अंगाला

दोनं पिढ्या सांभाळीला
पोरासोरांचा बोभाट
दोन घरांचा झालेला
सांधी पाटील इस्कोटं


दोन जळत्या घरात
डाव गोडीचा खेळला
किती वेळा गावामंदी
पाणउतारा झेलला

मुंडोशाला बघा त्याच्या
सदा झळाळी सत्वाची
पाटलाच्या खंबीरतेला
जोड विठ्ठल भक्तीची


नाही उन्हाच्या त्या झळा
या सावलीला गारं
पाटलाच्या छायेमंदी
गाव नांदतय सारं




Comments