Skip to main content

जवा बाप घाव घाली
ठिणग्या उडती ठिकऱ्या
त्याच्या काळ्या छायेमंदी
माय भाजते भाकऱ्या

माझा बाप काळा काळा
त्याची आडदांड छाती
करपल्या उन्हामंदी
त्याचं दंड चकाकती

शीक पडला कितीही
अंगी भणाणला ताप
चिवट खडक घणाशी
झुंज घेई माझा बाप

नाही बुक तो शिकला
तरी शिकवी आमाला
दोघांच्याबी फियासाठी
बाप फोडी दगडाला

 कष्ट पाहुनिया त्याचं
नभी सूर्य झेकांडला
तापल्या त्या त्वचेवरी
घास आमचा शिजला

त्याच्या सर्वांगी निथळं
उन्ह घामाचं ते पाणी
चरचरं दगडावरी
गात नवेलीची गाणी

-दामुशक


Comments